⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

Rain News : राज्यातील ‘या’ 15 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२२ । मान्सून महाराष्ट्रात सक्रीय झाल्याचे (Weather department) हवामान विभागाकडून सांगण्यात येत असले तरी म्हणावं तसा दमदार पाऊस झालेला नाहीय. जळगाव जिल्ह्यातील काही भागात काल शनिवारी रात्री पाऊस झाला. मात्र, पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने (Kharif Season) खरीप हंगामावरील चिंतेचे ढग हे कायम होते. दरम्यान, दुसरीकडे हवामान खात्याने राज्यातील 15 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातून महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून आता गुजरातकडे आगेकूच करीत आहे.

यंदा वेळेपूर्वी मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, अनिश्चित व अनियमित पावसाची वाट पाहण्यात 20 दिवस गेले आहेत.
राज्यात मान्सून दाखल होऊन दहा दिवस उलटले. तरी देखील काही अपवाद वगळता काही ठिकाणी अद्यापही पावसाने दमदार हजेरी लावली नाहीय. हवामान खात्यांकडून रोज नवनवीन अंदाज वर्तविला जात आहे. मात्र अद्यापही दमदार पाऊस कोसळत नाहीय. जळगाव जिल्ह्यात गेल्या सोमवारी मान्सून दाखल झाला होता. तेव्हापासून अद्यापही पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने शेतकरी गर्वावर चिंतेचे ढग ओढवले आहे.

दमदार पाऊस नसल्याने विविध कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी जमिनीतील ओल पाहूनच खरीप पेरणी करणे गरजेचे आहे. 15 दिवस पेरण्या लांबणीवर गेल्या आहेत पण ओल नसताना चाढ्यावर मूठ ठेवली तर पेरणीचा उपयोग नाही. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊनच शेतकऱ्यांनी निर्णय घेणे गरजेचे आहे.

जून महिन्याच्या अंतिम टप्प्यात पावसाचे स्वरुप बदलत असल्याचे संकेत हवामान विभागाकडून दिले जात आहेत. शनिवारपासून (Maharashtra) राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे तर दक्षिण कोकणात तर सोमवारपासून अति मुसळधार पाऊस बरसणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातून महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून आता गुजरातकडे आगेकूच करीत आहे.

या जिल्ह्यांना आहे ‘यलो अलर्ट’
हवामान खात्याकडून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट तर सिंधुदुर्गला 18 ते 21 जून आणि रत्नागिरीला 20 ते 21 जून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.