हवामान

Monsoon Alert: पुढील आठवड्यात धडकणार मान्सून; IMD कडून ४ आठवड्याचा अंदाज जारी

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२२ । यंदा उन्हाच्या तडाख्याने राज्यातील नागरिक चांगेलच हैराण झाले आहे. उन्हाच्या तप्त झळा आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण यंदाच्या मान्सूनबाबत दिलासा देणारी बातमी आहे. यंदा मान्सूनचे आगमन हे वेळेपूर्वीच होणार असून आठवड्याभरात आंदमानमध्ये मान्सून धडकणार असल्याचे (IMD) भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. तर तळकोकणात देखील 27 मे ते 2 जून दरम्यान मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने पुढील चार आठवड्याचे अंदाज वर्तवले आहेत.

rain jpg webp

दरवर्षी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य मान्सूनची वाट पाहत असतो. मागील काही दिवसापासून महाराष्ट्रासह अनेक भागात उष्णतेने कहर केला आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिक चांगेलच हैराण झाले आहे. त्यातून आता लवकर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरवर्षी अंदमानमध्ये पाऊस २२ मेपर्यंत मान्सून दाखल होतो. पण हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १३ ते १९ मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी मान्सून हजेरी लावणार आहे. तर केरळमध्ये २० ते २६ मेपर्यंत पाऊस दाखल होईल तर तळकोकणात २७ मे ते २ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने 4 आठवडे कसे राहतील याबाबत अंदाज वर्तवला आहे. यामध्ये मान्सूनचे आगमन तर वेळेपूर्वीच होणार हे स्पष्ट झालं आहे पण राज्यात केव्हा मान्सून दाखल होणार याची माहिती ही 15 मे रोजी दिली जाणार आहे. तळकोकणात आणि मुंबईच्या काही भागात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस होणार असल्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.

खरीप हंगामासाठी पोषक वातावरण
सध्या शेतकऱ्यांना खरिपाची लगबग लागली असून शेतजमिनी मशागतीची कामे सुरु आहेत. वेळेत पाऊस झाला तर उत्पादनात वाढ होणार आहे. शिवाय परतीच्या पावसाचा धोका राहणार नाही. गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकरी तत्पर झाला असून पावसाने जर साथ दिली तर उत्पादनात वाढ होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button