---Advertisement---
गुन्हे भुसावळ

कंडारी येथील 20 वर्षीय युवतीचा विनयभंग : पोलिसात गुन्हा दाखल

crime
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२१ । भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील 20 वर्षीय युवतीला माझ्याशी लग्न कर नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देत युवतीला रिक्षातून बाहेर काढून मारहाण केल्याप्रकरणी आणि युवतीचा विनयभंग केल्या प्रकरणी कंडारी येथील हर्षल दिलीप चौधरी या युवकाविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

crime

शहरालगत असलेल्या कंडारी येथील 20 वर्षीय युवतीला माझ्याशी लग्न कर असे म्हटले, युवतीने मी तुला भाऊ मानते, असे होणार नाही असे म्हटलने त्याचा रांग आल्याने हर्षल चौधरी याने युवती जळगाव येथून परिक्षा देऊन आल्यावर शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गांधी पुतळ्याजवळील रिक्षात बहीणीसह घरी जाण्यासाठी बसली असता. हर्षल याने येत माझ्या मम्मीला का शिवीगाळ केली असे म्हणत युवतीला रिक्षाच्या बाहेर काढून मारहाण केली. व जातीवाचक बोलला. 

---Advertisement---

यावेळी युवतीच्या बहिणीनें वाद सोडवला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून हर्षल चौधरी याच्या विरूध्द विनयभंग, जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे हे पुढील तपास करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---