आरोग्य केंद्रातील महिला शिपाईचा विनयभंग; गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । आरोग्य केंद्रात शिपाई म्हणून काम करणाऱ्या ३३ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार यावल तालुक्यात उघडकीला आला आहे. मिलींद साहेबराव जंजाळे (वय-३२) असे संशयित आरोपीचे नाव याप्रकरणी महिला शिपाईने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर असे की, यावल तालुक्यातील रहिवाशी असलेली ३३ वर्षीय विवाहिता ही तालुक्यातील एका आरोग्य केंद्रावर शिपाई पदावर काम करते. २ डिसेंबर रोजी दिवसभर काम आटोपून महिला शिपाई यांनी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रावर काम करणारा मिलींद साहेबराव जंजाळे (वय-३२) यांच्या दवाखान्याची चाबी देत असतांना मिलींद यांने महिलेच्या गालावर हात फिरवत तिच्या हाताला स्पर्श करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी महिला शिपाईने रात्री ८.३० वाजता यावल पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मिलीद जंजाळे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहेकॉ सिकंदर तडवी करीत आहे.