मोहन भागवत आले जळगाव जिल्ह्यात ! हे आहे कारण

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२३ । सरसंघचालक मोहन भागवत हे भुसावळ येथे रेल्वे स्टेशन येथे आले होते. कडेकोट पोलीस बंदोबस्तात ते बर्‍हाणपूरकडे रवाना झाले.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे दोन दिवसांच्या बर्‍हाणपूर दौर्‍यावर आहेत. येथे जाण्यासाठी ते अहमदाबाद येथून आज सकाळी नवजीवन एक्सप्रेसने भुसावळ रेल्वे स्थानकावर आले. येथे अत्यंत चोख असा बंदोबस्त लावण्यात आला होता. सोबत भला मोठा ताफा आणि पोलिसांच्या गाड्यांसह ते लागलीच बर्‍हाणपूर येथे रवाना झाला.

बर्‍हाणपूर येथे मोहन भागवत हे अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. यात प्रामुख्याने ते रेवा गुर्जर भवनात आयोजीत करण्यात आलेल्या धर्म संस्कृती सभेत सहभागी होणार आहेत. तर डॉ. भागवत यांच्या उपस्थितीत उद्या बर्‍हाणपूर येथे डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या समर्थ भवनाचे भूमिपुजन करण्यात येणार आहे.