⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

मानवी प्रणाली शरीरशास्त्र आणि शरीरविज्ञान या विषयावर मॉडेल प्रदर्शन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२४ । जळगाव येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग जळगाव, १५ मार्च २०२४ रोजी बाल आरोग्य परिचर्या विभागातर्फे आयोजित मानवी प्रणाली शरीरशास्त्र आणि शरीरविज्ञान या विषयावर मॉडेल प्रदर्शन आयोजित केले गेले. मॉडेल प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य विशाखा वाघ, मा. उपप्राचार्य अश्विनी वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून करण्यात आले.

या प्रदर्शनात बीएस्सी प्रथम वर्षाच्या १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. स्नायू प्रणाली, कंकाल प्रणाली, प्रजनन प्रणाली, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली, श्वसन प्रणाली, पाचक प्रणाली, मज्जासंस्था, जननेंद्रियाची प्रणाली आणि अंतःस्रावी प्रणाली या ९ विषयांवर विविध मॉडेल तयार केले. मार्गदर्शन करतांना प्राचार्य विशाखा वाघ यांनी अशा प्रकारच्या शैक्षणिक प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते तसेच कौशल्य विकसित होत असतात त्यामूळे विदयार्थ्यांनी गाभीर्यांने अशा प्रदर्शनात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. प्रदर्शनाची मान्यवरांनी पाहणी केली. गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग प्री-क्लिनिकल सायन्स लॅबमध्ये या एक दिवसिय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

हार्डबोर्ड क्‍ले तसेच चित्रांच्या स्वरूपात वरील विषयावर मॉडेल बनवण्यात आले होते. प्रदर्शनात प्रथम पारितोषीक विजेता गु्रप सी च्या हदयाचे कार्य व रचना,तर व्दितीय गु्रप एच मुत्राशयाचे कार्य व रचना व तृतीय पारितोषीक गु्रप आय स्त्रीयांची प्रजनन संस्था कार्य व रचना यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांना बाल आरोग्य परिचर्या विभागाच्या प्रमुख प्रा.अश्विनी मानकर,प्रा मोनाली बारसागडे, यांनी मार्गदर्शन केले. प्रा. स्मिता पांडे प्रा. पायल वाघमारे,प्रा. शिल्पा वैरागडे, प्रा. अस्मिता जुमडे गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव यांनी परीश्रम घेतले.