⁠ 
सोमवार, मे 20, 2024

यावल शहरातील साफसफाई करण्याची मनसेची मागणी ; मुख्यधिका-यांना दिले निवेदन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२१ ।  य़ावल शहरातील विविध भागात साफसफाई होत नसल्याचे ओरड होत आहे. सर नगरपालिका आणि प्रशासनाने येत्या आठ दिवसांत शहरातील साफसफाई करण्यात यावी अन्यथा नगरपालिका समोर कचरा आणुन टाकू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे यासंदर्भात नगरपालिकेला निवेदन देण्यात आले आहे.

भुसावळ रोड फालक नगर गंगा नगर जे टी महाजन संकुल मेन रोड या भागात वेळेवर साफसफाई होत. शहरातील नाले सफाई या वर्षी करण्यात आली नाही आताची परिस्थिती पाहता ५ टक्क्यांपेक्षा अधिक नालेसफाई झाली नाही. मे महिन्यात २५ तारीख ओलाडूनही पावसाळा तोंडावर आला आहे असे असतांनाही नालेसफाई होत नसल्याने तर यांची जबाबदारी कोणाची? त्याच ठेकेदारांना ठेके देवून प्रशासन आपले उखळ पांढरे करून घेत आहे की प्रशासन आणि ठेकेदारांची टक्केवारी ठरलेली आहे त्यामुळे नालेसफाई होतांना दिसत नाही. पावसाळा तोंडावर आला असतांना कोरोना संकटकाळात यंदाही कामे होनार की नाही  असा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे यावल शहरात अडचन निर्माण झाल्यास तर शहरातील नागरिकांना पावसाळ्यात गैरसोयीचे सामना करावा लागत आहे. आम्ही मनसेतर्फे शहरातील नालेसफाईची पाहणी केली. या पाहनीमध्ये शहरातील काही भागात नालेसफाई योग्य पद्धतीने केली नसल्याचे दिसून आले आहे. नाल्यांमध्ये (गटार ) गाळ कचरा तसाच असून नाले गाळमुक्त न केल्याने पावसाळ्यात शहरात पाणी भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसांत नालेसफाई पूर्ण करण्यासाठी केला नाही तर नगरपालिकासमोर कचरा आणून टाकू याची सर्व जबाबदारी नगरपालिका यावल व आरोग्य अधिकारी यांची राहील याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी याबाबतचे निवेदन दिले आहे.

निवेदन देतांन जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर. तालुका उपाध्यक्ष शाम पवार, शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, विद्यार्थी सेना गौरव कोळी  विभागाध्यक्ष अरविंद कच्छी विपुल येवले प्रतिक येवले गोविंदा सुतार राहूल सुतार आदी उपस्थित होते.