मुंबई MMRDA मध्ये दहावी ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरी संधी; 235 जागांसाठी भरती, ‘इतका’ पगार मिळेल..

फेब्रुवारी 21, 2026 2:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । मुंबईत सरकारी नोकरीची एक उत्तम संधी आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीसाठी दहावी पास ते पदवीधर आणि ITI झालेले उमेदवारही अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे एकूण 235 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. MMRDA Bharti 2026

MMRDA Bharti 1

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाईट mmrda.maharashtra.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2026 आहे. त्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा. MMRDA Recruitment 2026

Advertisements

पदाचे नाव & तपशील:

Advertisements
पद क्र.पदाचे नाववर्गपद संख्या
1सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)07
2सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (रेलपथ)01
3सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (संकेत व दूरसंचार)01
4उपनियोजक29
5सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक04
6सहाय्यक अभियंता श्रेणी-२/कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)82
7सहाय्यक अभियंता श्रेणी-२ /कनिष्ठ अभियंता (रेलपथ)04
8सहाय्यक अभियंता श्रेणी-२ /कनिष्ठ अभियंता (विद्युत)16
9सहाय्यक अभियंता श्रेणी-२ /कनिष्ठ अभियंता (संकेत व दूरसंचार)02
10सहाय्यक समाज विकास अधिकारी07
11सहाय्यक विधी अधिकारी04
12उद्यान विद्या सहाय्यक02
13उप लेखपाल33
14लघुटंकलेखक10
15भूमापक31
16संगणक तंत्रज्ञ02

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) वास्तुशास्त्रज्ञ किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नियोजन यामधील किंवा समतुल्य पदवी (ii) ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी मान्यता दिलेली नगर नियोजनातील पदव्युत्तर पदवी.
पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन पदवी/डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी (MSW)
पद क्र.11: (i) विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.12: (i) वनस्पती शास्त्र, कृषी शास्त्र, उद्यान विद्या शास्त्र, वनशास्त्र अथवा समकक्ष पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.13: (i) 60% गुणांसह B.Com (मागासवर्गीय:55% गुण) (ii) MS-CIT (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. व टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (सर्वेक्षक) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंगचा दोन वर्षांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम. (iii) 07 वर्षे अनुभव

वयोमर्यादा
उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असावे. मागासवर्गीय/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा 43 वर्षे आणि अपंग उमेदवारांसाठी 45 वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे.

अर्ज शुल्क
अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, प्रवर्गनिहाय शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.
सामान्य/ओबीसी: ₹1000
एससी/एसटी: ₹1000
पीडब्ल्यूबीडी: शुल्क नाही (शून्य)

इतका पगार मिळेल?
सहाय्यक अभियंता – 56,100/- ते 1,77,500/-
उपनियोजक – 56,100/- ते 1,77,500/-
सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक- 44,900/- ते 1,42,400/-
सहाय्यक अभियंता श्रेणी- 41,800/- ते 1,32,300
सहाय्यक समाज विकास अधिकारी – 41,800/- ते 1,32,300
सहाय्यक विधी अधिकारी – 41,800/- ते 1,32,300
उद्यान विद्या सहाय्यक – 41,800/- ते 1,32,300
उप लेखपाल – 38,600/- ते 1,22,800/-
लघुटंकलेखक – 25,500/- ते 81,100/-
भूमापक – 25,500/- ते 81,100/-
संगणक तंत्रज्ञ – 19,900/- ते 63,200/-

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now