रस्त्यांसाठी सां.बा.विभाग व मनपाच्या अभियंत्यांनी सर्वे करावा – आमदार सुरेश भोळे
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२३ । : शहरातील रस्त्यांसाठी १८५ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. या निधीतून रस्त्यांची कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या अभियंत्यांनी आठ दिवसात एकत्रित सर्वेक्षण करावे, तसेच महानगरपालिकेने तातडीने अमृत योजनेचे नळ कनेक्शन देवून रस्त्यांच्या कामासाठी ना हरकत (एनओसी) द्यावी, अशा सुचना आ. सुरेश भोळे यांनी दिल्या.
सोमवारी महापालिकेच्या सभागृहात आ. सुरेश भोळे यांच्या अध्यक्षतेखाली शंभर कोटींमधील रस्त्यांच्या नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपायुक्त गणेश चाटे यांच्यासह एमआयएमचे रियाज बागवान, ललित कोल्हे, प्रवीण कोल्हे, नितीन बरडे, ॲड. दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, शुचित हाडा, राजेंद्र घुगे, विशाल त्रिपाठी व सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
जळगाव शहरातील १८५ कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे मंजुर झाली आहेत. परंतु शहरात अमृत योजने अंतर्गंत होणाऱ्या पाणी पुरवठा व मलनिस्सारणच्या वाहिन्यांचे काम अपुर्ण असल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. या निधीतून २६७ रस्त्यांची कामे मंजुर झाली आहेत. परंतु १७६ रस्त्यांवरील मलनिस्सारण योजनेचे काम बाकी असल्यामुळे सदर रस्त्यांचे काम कसे करता येतील याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी रस्त्यांच्या मधोमध दीड मीटर डांबरीकरण व आजू बाजूला एक एक मीटर पेव्हर ब्लॉक बसवून रस्त्यांचे काम मार्गी लावता येईल का यावर चर्चा झाली. त्यावेळी सां.बा. विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुम्ही आम्हाला एनओसी द्या, आम्ही त्या पध्दतीने टेंडर राबवू महिन्याभरात या तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता घेवून टेंडर केले जाईल असे देखील त्यांनी सांगितले.
नळकनेक्शनसाठी जास्तीच्या पैशांची होते मागणी
यावेळी नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे यांनी सां.बा.विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, शंभर कोटीमधील कामांचे एकच टेंडर काढा, आधी ५० कोटी नंतर ५० कोटी असे दोन टप्पे करू नये, तसेच अमृत योजनेमुळे कामे थांबायला नको, अशा सुचना देखील त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना नळकनेक्शनसाठी जास्तीचे पैसे मागितले जातात त्यामुळे नळ कनेक्शन वेळेत दिले गेले नाहीत व त्याचा परिणाम आता रस्त्यांचा कामांवर होत आहेत, असा आरोप डॉ. अश्विन सोनवणे यांनी केला.
दोन दिवसात अडचणींचा अहवाल देवू: आयुक्त
रस्त्यांसाठी ज्या ज्या ठिकाणी अडचणी येत असतील त्यांची माहिती घेवून दोन दिवसात अहवाल देवू अशी ग्वाही आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिली. रस्त्यांच्या कामात येणार अडचणींची माहिती सर्व अभियंते यांच्याकडून घेण्यात येईल, गटारी व विद्युत पोल स्थलांतरणाचा अहवाल दिला जाणार आहे.
लिकेज शोधण्यासाठी मशिन घ्या : आ. भोळे
रस्ते झाल्यानंतर महापालिकेकडून पुन्हा रस्ते खोदण्यात येत असल्यामुळे नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. कर भरून देखील नागरिकांना सुविधा महापालिकेकडून दि