तापी परिसर विद्या मंडळ अध्यक्षपदी आ.शिरीष चाैधरी
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ या संस्थेची २०२१ ते २०२६ या कालावधीसाठी कार्यकारिणी निवड बिनविराेध झाली. अध्यक्षपदी आमदार शिरीष चाैधरी यांची निवड करण्यात आली.
संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्या पात्र उमेदवारांनी अर्ज भरले. परंतु १९ रोजी सर्व सभासदांनी माघारीचे अर्ज आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे सोपवून त्यांना सर्वाधिकार दिले. आमदार चौधरी यांनी निवडणूक अधिकारी डॉ.व्ही.आर. पाटील यांना पात्र उमेदवारांची यादी दिली. त्यांनी वैध उमेदवारांची निवड घोषित केली. अध्यक्षपदी आमदार शिरीष चाैधरी यांची निवड करण्यात आली.
उर्वरीत कार्यकारिणी अशी
उपाध्यक्ष डॉ.एस.के. चौधरी व मिलिंद वाघुळदे, चेअरमन लीलाधर चौधरी, व्हा.चेअरमन प्रा.किशोर चौधरी, सचिव प्रा. मुरलीधर फिरके, सहसचिव प्रा.नंदकुमार भंगाळे तसेच नियामक मंडळ सदस्यांची वैध उमेदवारांची निवड यादी घोषित करण्यात आली.