---Advertisement---
भुसावळ

आरटीओ ऑफिसचा गोलमाल कारभार : आ.संजय सावकारेंची गाडी चक्क मंत्र्यांच्या नावावर ट्रान्सफर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा गोलमाल कारभार चव्हाट्यावर आला आहे. कारण भुसावळचे (Bhusawal) आमदार संजय सावकारे(Sanjay Savkare) यांच्या मालकीची गाडी चक्‍क परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या संदर्भात आमदार सावकारे यांनी आरटीओ कार्यालयात अधिकृत तक्रार नोंदवून चौकशीची मागणी केली आहे.

sanjay savkare anil parab jpg webp

नेमका काय आहे प्रकार?

---Advertisement---

आ.संजय सावकारे यांच्या मालकीची (१९, सीझेड ५१३०) कार गाडी अन्य कुणालाही विक्री केली नसतानाही २४ डिसेंबर २०२१ रोजी परस्पर ट्रान्सफर करून परिवहन मंत्री अनिल दत्तात्रय परब (Anil Parab) यांच्या नावे केल्याची माहिती उघडकीस आली आहे. यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

ही गाडी अनिल परब यांच्या नावावर नोंदणी केली तर ते प्रत्यक्ष आले होते का? ते जर आले नाही तर त्यांच्या नावावर गाडी ट्रान्सफर होवून नोंदणी झाली कशी? किंवा पहिल्या गाडी मालकाने गाड़ीसाठी कर्ज घेतले असेल तर त्याची एनओसी घेतली होती का? असे अनेक प्रश्न उपस्थित आहे.

दरम्यान, भोंगळ कारभार आरटीओ कार्यालयात सुरू असून या याबाबत चौकशी व्‍हायला हवी, अशी मागणी आ.सावकारे यांनी केली आहे.

यापूर्वी देखील जळगाव आरटीओ (Jalgaon RTO) कार्यालयातून मंत्र्यांच्या नावाने लायसन्स दिले गेले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. असे असतांनाही आता तर चक्‍क जळगाव आरटीओ कार्यालयात सावकारे यांच्या मालकीची गाडी परिवहन यांच्या नावावर ट्रान्सफर करुन नोंदणी केली गेली आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---