जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२३ । उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आजुन एक मोठा धक्का बसला आहे. कारण ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या अशी ओळख असलेल्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनिषा कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
मनिषा कायंदे या मागच्या काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. मनिषा कायंदे या नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोन बंद आहे. शिवाय त्यांच्याशी संपर्क होत नाहीये. तर आज मनिषा कायंदे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
मनिषा कायंदे या ठाकरेंच्या आक्रमक नेत्या आहेत. त्यांनी शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडली आहे.कित्येकदा शिवसेनेची ढाल म्हणून त्या उभ्या राहिल्या आहे. शिवसेनेत जाण्याने ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे.