जळगाव जिल्हा दूध संघात कोट्यावधींचा अपहार ; आ.चव्हाणांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

ऑक्टोबर 11, 2022 5:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२२ । भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी जळगाव जिल्हा दूध संघातील (Jalgaon Dudh Sangh) तुपाप्रमाणे लोणी व दूध पावडरच्या मालाची परस्पर विक्री करून दूध संघाची कोट्यावधी रूपयांची फसवणूक झाल्याची लेखी तक्रार आज जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याकडे केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या तक्रारीनंतर गुन्हा कधी आणि कुणाविरुद्ध होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

jalgaon jilha doodh sangha jpg webp

काय म्हटले आहे तक्रारीत?
आ.चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जळगाव जिल्हा सहकारी दूध संघात यापूर्वी देखील ए ग्रेडचे उच्च प्रतीचे असलेले तूप बी ग्रेडचे म्हणजेच कमी प्रतीचे दाखवून चांगल्या व स्टैंडर्ड तुपाची परस्पर विल्हेवाट लावून त्याच्या विक्रीतून आलेल्या रकमेची अपहार करून दूध संघाची फसवणूक केल्या बद्दल यापूर्वी देखील शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान संबंधित विठ्ठल रुक्मिणी एजन्सी यांनी सदरील अपहार व फसवणुकीतील रक्कम दि. ९ व दि. १० सप्टेंबर रोजी २ लाख ३१ हजार ८४० रुपये ही रक्कम परस्पर जाऊन भरलेली आहे.

तसाच प्रकार अलीकडे घडलेला आहे. जिल्हा दूध संघाच्या फिनिश प्रॉडक्ट विभागाच्या रेकॉर्डला १४ टन बटर अर्थात लोणी पाठवल्याची नोंद २ ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यात आली आहे. सदरील बटर हे अतिरिक्त प्रॉडक्ट असल्यामुळे इतरत्र असलेल्या कोल्ड स्टोरेजच्या ठिकाणी पाठविण्यात आले. जसे की यामध्ये सातारा येथील पी. डी. शहा अँड सन्स वाई या ठिकाणी पाठविण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतू तेथून परत आलेला मालात ७० ते ७५ टक्के हा विकास अर्थात जिल्हा दूध संघाच्या प्रॉडक्शन नव्हता. यामध्ये जिल्हा दूध संघाचे फक्त शंभर ते दीडशे खोके आढळून आले. उर्वरित माल हा बिना खोक्याचा आहे. म्हणजेच जळगाव दूध संघाचे पॅकिंग नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now