⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | लायकी नसतांनाही… आ.गिरीश महाजनांची खडसेंवर जहरी टीका

लायकी नसतांनाही… आ.गिरीश महाजनांची खडसेंवर जहरी टीका

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधकांना अद्दल घडवण्याची भाषा केली होती. गृहमंत्रालयाचा हिसका दाखवा, असं आवाहनच त्यांनी शरद पवारांना केलं होतं. त्यावर आता भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan)यांनी खडसेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. लायकी नसताना पक्षानं एकनाथ खडसेंना पद दिलं, असा घणाघात महाजनांनी केलाय.

त्यांचं भाषण मी ऐकलं, म्हणाले दोन चार मानणांना जेलमध्ये टाका. एखादा विक्षिप्त माणूसच असं करू शकतो, मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असेल तर ग्रामपंचायतीला पडतो का? असा खोचक सवाल महाजनांनी केलाय. खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. अशी टीकाही महाजनांनी केलीय.

समस्या निर्माण करून अगोदर जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे आणि नंतर ते पुसण्याचे नाटक करून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. तसेच कर्जबाजारी करून त्याच्या कर्जमुक्तीच्या कागदी घोषणा करण्याचे व त्याचे खोटे घेण्याचे प्रकार याआधी उघडकीस येऊनही विजेच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारने पुन्हा तोच खेळ मांडला आहे. शेतकरी व सामान्य जनतेची सहानुभूती मिळविण्याकरिता कोळसा टंचाईचे खोटे कारण पुढे केले जात असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

काय म्हणाले होते खडसे?
शरद पवारांच्या जळगाव दौऱ्यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. राज्यात सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप यावेळी खडसेंनी भाजपवर केला होता. त्यावेळी खडसेंनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिलेला सल्लाही चर्चेचा विषय ठरतोय. वळसे पाटलांना अनेकदा सांगतो, की गृहमंत्रीपद जे आहे, त्याचा दाखवा एकदा हिसका, दाखवा एकदा इंगा, असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय. शेकडो प्रकरणं यांची आहेत. दोन चार लोकांना वर्षापूर्वीच टाकून दिलं असतं, तर ही परिस्थिती आली नसती, असंही खडसे म्हणाले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.