जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । मतदार संघात सध्या एक ऑडिओ क्लिप फिरत असून याप्रकरणी एका महिलेच्या पतीने मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मी विधानसभा निवडणुकीच्या वेळेस सांगितले होते की, अशा व्यक्तीमुळे तुमच्या मुली सुरक्षित राहणार नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता केला. दरम्यान त्यावर आता आमदार चंद्रकांत पाटलांनी सडकून टीका केलीय.
राजकिय पराभवाच्या नैराश्यपोटी बेशुट आरोप करणे योग्य नाही, त्या ऑडिओ क्लिपमधील संवादाचा माझा काहीही संबंध नाही. एकनाथ खडसे अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सवरलेले नाहीत, असा टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. बोदवड येथे शासकीय विश्राम गृह येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
मी गेल्या दोन वर्षांपासून मतदार संघातील रस्ते, सिंचन, पिण्याचे पाणी, गटार,शेत रस्ते, इत्यादी कामे करीत आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील आमदार झालेल्या व्यक्तीकडून होत असलेला मतदारसंघाचा विकास त्यांना पाहवत नाही. त्यामुळे त्यांचे डोके ठिकाणावर नाही. वैक्तिक उणे ,दुणे, काढू नका, आमदाराला खंडणी खोर म्हणणे हे सुसंस्कृत व्यक्तीचे लक्षण नाही, असेही ते म्हणाले
खडसे मंत्री असतांना व्यासपीठावर सून रक्षा खडसे, कन्या रोहिनीताई खडसे खेवलकर उपस्थित असताना त्यांनी अंजली दमानिया यांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान केले होते. याबाबत मुंबईत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आह. अडीच वर्षापासून महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे गोरे खून प्रकरणात त्यांचा भाचा जेलमध्ये आहे. म्हणून त्यांना महिलांचा किती कनवाळा आहे ते यावरून दिसून येते. पुण्यातील भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात जावई, पत्नीच्या व्यवहारात माझा काय संबंध हे वाक्य जो व्यक्ती निगरगट्ट पणे म्हणतो ती व्यक्ती इतरां बाबतीत काय बोलेल? खडसे यांची सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची पद्धत ही खालच्या थराची आहे. अकरा विधानसभा मतदार संघातील लोकप्रतिनिधी व खडसे यांची बोलण्याची शैली वेगळी आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.