---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

आमदार चंद्रकांत पाटील यांनी भरला अधिकाऱ्यांना दम !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्युज | सुभाष धाडे | मुक्ताईनगर आठवड्याचा दुसराच दिवस असताना पंचायत समिती कार्यालयात आमदार चंद्रकांत पाटील यांनी अचानक भेट देत कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. त्यात जवळपास ९० टक्के कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. एवढेच नव्हे तर कर्मचारी नियमित हजर राहिले नाही तर त्यांची खैर नाही, असा सज्जड दम देखील दिला.

chandrakant patil jpg webp webp

मंगळवारी प्रशासकीय कामकाजाचा आठवड्यातील दुसराच दिवस असताना मुख्यालयी १० टक्के कर्मचारी उपस्थित होते. आमदार पाटील यांनी हालचाल रजिस्टरची मागणी केली असता कर्मचारी गोंधळून हालचाल रजिस्टरमध्ये कामानिमित्त बाहेर असल्याचे दाखवून बहुतांश कर्मचारी खासगी कामासाठी बाहेर असल्याची खात्री पटली. मुजोर कर्मचाऱ्यांमुळेच तालुक्यातील नागरिकांची फरपट होत असल्याचे निदर्शनात आले. आमदार पाटील यांनी दखल घेत तत्काळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामविकास सचिव यांच्याशी संपर्क करत कारवाईची मागणी केली.

यावेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, शिवसेना विभागप्रमुख महेंद्र मोंढाळे, युवासेनेचे सचिन भोई, नीलेश मेढे, स्वीय सहायक प्रवीण चौधरी व प्रशांत पाटील उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---