---Advertisement---
जळगाव शहर प्रशासन

आ.सावकारे कार ट्रान्सफर प्रकरण : सहाय्यक आरटीओ निलंबीत

---Advertisement---

कार ट्रान्सफर प्रकरण आले अंगाशी

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । येथील RTO ऑफिस नेहमी काहींना काही कारणांनी चर्चेत असते. नुकतेच येथील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश वामन पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. आमदार संजय सावकारे यांची कार परस्पर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर केल्याच्या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

rto 3

दि २८ डिसेंबर रोजी सावकारे यांची कार परस्पर परब यांच्या नावे करण्यात आली होती. ओटीपीसाठी अशोक पाटील या आरटीओ एजंटचा नंबर वापरण्यात आला होता. त्यानंतर अशोक पाटीलसह प्रशांत भोळे व शेख अकील शेख रेहमान या तिघांवर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटकही केली करण्यात आली होती. त्यानंतर जळगावच्या आरटीओ विभागाने दोन वेळा ऑनलाइन प्रक्रिया करुन सावकारे यांची कार पुन्हा त्यांच्या नावे करुन त्यांना फर्स्ट ऑनर केले.

---Advertisement---

या प्रकरणात गणेश पाटील यांनी अक्षम्य महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १०७९ च्या नियम तीनचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानूसार त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) या अंतर्गत शासनाला प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करुन त्यांना तात्काळ निलंबित केले आहे. निलंबनाच्या कार्यकाळात गणेश पाटील यांचे मुख्यालय औरंगाबाद असणार आहे. कार्यालयाच्या परवानगीशिवाय त्यांना कार्यालय सोडता येणार नाही. या कालावधीत त्यांना खासगी नोकरी, व्यवयास करता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्यपालांच्या आदेशाने सदर कारवाई करण्यात आली असून आदेशावर अव्वर सचिव म.रा.लांघी यांची सही आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---