संतापजनक ! घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयित नराधम अटकेत

एप्रिल 16, 2026 11:37 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । महिलांसह मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नसून अशातच जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून, तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगावच्या एमआयडीसी पोलिसांनी संशयित नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. तेजस गजानन हिरे (रा. पारगाव, ता. चोपडा) असं अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

Untitled design 15 jpg webp

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असून ती धरणगाव तालुक्यातील आपल्या आजीच्या गावी गेली होती. १३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास तेजस हिरे हा संशयित आरोपी पीडितेच्या आजीच्या घरात अनधिकृतपणे शिरला.

आरोपीने पीडितेच्या आईला ठार मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केली. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिचे तोंड स्कार्फने बांधले आणि लाकडी दांड्याने तिला बेदम मारहाण केली. या दहशतीखाली आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता, ही घटना कोणाला सांगितल्यास पीडितेसह तिच्या आईलाही ठार मारण्याची धमकी आरोपीने दिली.

घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने धीर एकवटून १४ एप्रिल रोजी जळगाव गाठले आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तेजस हिरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने संशयित आरोपी तेजस हिरे याला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक माधुरी बोरसे या करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now