---Advertisement---
गुन्हे चाळीसगाव

चाळीसगाव हादरले ! लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार ; पीडीता गर्भवती

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२२ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना काही केलं तरी थांबण्याचं नाव घेत नाहीत. अशातच चाळीसगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून पीडीता गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राकेश युवराज जिरे (22, चाळीसगाव तालुका) यांच्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

crime 1 jpg webp

नेमकी काय आहे घटना?
चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय पीडीता आपल्या आई वडील व भावासह वास्तव्यास आहे. पीडीतेच्या घरासमोर संशयीत आरोपी राकेश युवराज जिरे (22) हादेखील वास्तव्यास असून त्याने पीडीतेशी सलगी वाढवत तुला पसंत करतो, माझ्याशी लग्न कर म्हणत पीडीतेचा पाठलाग करून तिच्यावर सन 2021 ते एप्रिल 2022 दरम्यान वारंवार अत्याचार केला तसेच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

---Advertisement---

या प्रकारातून पीडीता गर्भवती राहिली तसेच आरोपीने पीडीतेच्या आई-वडिलांना व भावाला जीवे ठार मारेल, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. आरोपी राकेश युवराज जिरे (22) याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्य निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---