---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओपदी मीनल करनवाल ; श्री अंकित यांची बदली

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२५ । राज्य शासनाकडून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले असून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहे. यात जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांची बदली झाली आहे. त्यांची छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे.

zp jalgaon Minal Karanwal

त्याच्या जागी आता नांदेड येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांची जळगाव येथील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे. असे आदेश मंगळवारी आज १८ मार्च रोजी सायंकाळी काढण्यात आले आहे.

---Advertisement---

मीनल करनवाल या एक आयएएस अधिकारी आहे. २०१८ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षेत ३५ वा क्रमांक मिळवून आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली. त्या उत्तराखंड येथील रहिवासी आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment