जळगाव लाईव्ह न्यूज । उत्तरेकडे कडाक्याची थंडी असून उत्तरेकडून शीत लहरी राज्यात दाखल होत आहेत. ज्यामुळे तापमानात घसरण झाल्याने कडाक्याची तीव्रता अधिक वाढली आहे. शनिवारी जळगावचे तापमान ७ अंश इतके होते. सध्या जळगावही थंडीने गारठले असून हवामान खात्यानं जळगावसह ७ जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविली असून याच पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील काही दिवस राज्यात हुडहुडी वाढणार स्पष्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी कहर करत असून गारठा सातत्याने वाढतोय. सकाळच्या वेळी थंडगार वारे वाहत आहे. जळगावमध्ये मागच्या तीन दिवसापासून तापमान ७ अंशापर्यंत स्थिरावले असून कडाक्या थंडी वाढली आहे. नागरिक शेकड्याने

या जिल्ह्यांना अलर्ट
आहिल्यानगर, परभणी, निफाड आणि धुळे येथे थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला. यासोबतच भारतीय हवामान विभागाने नाशिक, आहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदूरबार, सोलापूर आणि पुणे येथे थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. याठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे.







