जळगाव जिल्हायावल

यावलात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सभासद नोंदणी अभियान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुका समन्वयक किशोर माळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून माजी आमदार मनीष जैन यांच्या हस्ते सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली.

यावल शहरातील गारवा हॉटेल येथे मनीष जैन हे वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन व आशीर्वाद देण्यासाठी आले. असता त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सभासद नोंदणी भरण्याची सुरुवात करत. सर्व कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संख्येने सभासद नोंदणीचे आवाहन केले. त्याचबरोबर आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत युवकांना संधी देऊ या संधीचे युवकांनी सोना करावे. आमचे मार्गदर्शन, आशीर्वाद नेहमीच सर्व युवक वर्गाच्या पाठीशी असेल असे सांगत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवक तालुकाध्यक्ष ॲड. देवकांत पाटील, शहराध्यक्ष हितेश गजरे, शहर कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे, सचिव भूषण खैरे, तालुका उपाध्यक्ष पवन पाटील आदींनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, माजी नगराध्यक्ष अतुलदादा पाटील, माजी नगराध्यक्ष व राकेश कोलते, आदिवासी आघाडीचे एम बि तडवी, महिला तालुका अध्यक्ष प्रतिभा निळ, महिला जिल्हा उपाध्यक्ष द्वारकाताई पाटील, माजी जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत नीळ आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक सरचिटणीस विनोद पाटील, विरावली शाखा अध्यक्ष गिरीष पाटील, पवन खैरे, पवन खर्चे, रोहन महाजन, समाधान पाटील, मोसिन खान, दिनेश माळी, प्रकाश भोसले, शुभम बारेला, विवेक अडकमोल, हरिष खाचने, अरुण कोळी, मधू शिर्के व छत्रपती ग्रुप बोरावल गेट, तेजस्विनी दुर्गाउत्सव मंडळ देशमुख वाडा, एकदंत गणेश मंडळ यांचे कार्यकर्ते उपस्थिती होते.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button