⁠ 
रविवार, मे 19, 2024

रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची सभा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । कोरोना प्रादूर्भाव कमी होत असल्याने इयत्ता बारावीच्या महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र, उपकेंद्र यापद्धतीने नियोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शालेय शिक्षण विभागाने विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याने विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव राजेंद्र अहिरे यांनी रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयात केले.

यावेळी व्यासपीठावर रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी, जळगाव जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी डॉ. डी. एम. देवांग, विकास अधिकारी दिपाली पाटील, सुपरवायजर विभागीय मंडळ रमेश गोसावी हे उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रचलित ऑफलाइन परीक्षेत मंडळाच्या वतीने काही बदल करण्यात आले आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार ७५ टक्के अभ्यासक्रमावर लेखी, तर ४० टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा होणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. यंदा परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ दिला आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकाही दहा मिनिटे आधी देण्यात येणार असल्याचे अहिरे यांनी सांगितले. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. आताही विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी पुरेसा अवधी आहे. पालकांनी लसीकरण पूर्ण करून घ्यावे. मात्र, परीक्षेला बसण्यासाठी लसीकरणाचे बंधन कोणाला करता येत नाही, असे अहिरे यांनी सांगितले. आतापर्यंत आणि बारावीच्या ६० ते ६५ टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले व विविध मार्गदर्शक सूचना यावेळी उपस्थित प्राचार्य, मुख्याध्यापक, केंद्रसंचालक, परिरक्षकाना यांना यावेळी देण्यात आल्या.

सभेचे नियोजन रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयाचे प्रा. संदीप पाटील, प्रा. अनिल सोनार यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. राहुल त्रिवेदी यांनी केले. सभेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी कौतुक केले.

हे देखील वाचा :