⁠ 
शनिवार, मे 4, 2024

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची उद्या शनिवारी महत्वपूर्ण बैठक

जळगाव लाईव्ह न्यूज। २५ ऑगस्ट २०२३। शरद पवार हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यासाठी अध्यक्ष खा. शरद पवार साहेबांच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे. उद्या शनिवार (दि. २६ ऑगस्ट) रोजी दुपारी १ वाजता जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात ह्या जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीत खा. पवार साहेबांच्या दौऱ्याच्या नियोजनासोबतच प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सूचनेनुसार नवीन जिल्हा कार्यकारीणी तसेच नवीन तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष निवडीवरही चर्चा होईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

तरी या बैठकीला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील युवक कार्यकर्त्यांनी बैठकीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन युवक चे ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले आहे