⁠ 
शनिवार, सप्टेंबर 21, 2024
Home | नोकरी संधी | टायपिंग येते का? बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी, 226 जागांवर भरती, पगार 81100

टायपिंग येते का? बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी, 226 जागांवर भरती, पगार 81100

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बृहन्मुंबई महानगरपालिकेत (Brihanmumbai Mahanagarpalika) भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून दहावीसह टायपिंग येणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराला BMC च्या अधिकृत portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे MCGM Bharti 2023

या भरती अंतर्गत एकूण 226 जागा भरल्या जातील अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो.

या पदांसाठी होणार भरती?
कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी नि-मराठी) या पदांसाठी ही भरती होणार आहे.

शैक्षणीक पात्रता :
उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम प्रमाणपत्र परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला / विज्ञान/ वाणिज्य/ विधी किंवा तत्सम शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उमेदवार 100 गुणांची मराठी भाषा विषयाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) किंवा मराठी विषय असलेली तत्सम परीक्षा (उच्चस्तर / निम्नस्तर) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकषानुसार उत्तीर्ण असणे, तसेच, 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उमेदवार खालीलप्रमाणे टंकलेखन व लघुलेखनाच्या किमान / विहित गतीचे शासनाचे प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे.
मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. & मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि.
इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. & इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि.

किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25,500 /- ते रु.81,100/- रुपये पगार मिळेल

असा’ करा अर्ज
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट https://portal.mcgm.gov.in वर जा.
परिपत्रकासोबत जोडलेल्या (HOW TO APPLY) मधील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करा.
इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीला अनुसरून दिलेली अर्हता आणि अटींची पूर्तता होत असल्याची खातरजमा करा.
नमुन्यातील ऑनलाइन अर्ज ऑनलाइन पद्धतीने, दिलेल्या वेळेत सादर करा.
उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवा.

नोकरीचे ठिकाण : मुंबई
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.