---Advertisement---
जळगाव शहर शैक्षणिक

एमबीए सीईटीच्या तयारीसाठी रायसोनी महाविद्यालयात क्रॅश कोर्स

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२१ । महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (स्टेट सीईटी सेल) २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी एमबीए व एमएमएस सीईटीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी एमबीए पदव्युत्तर प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असल्याने या परीक्षेसाठी ज्या विध्यार्थ्यानी अर्ज केले असतील अशा विध्यार्थ्यांसाठी जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाने या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी दिनांक ६  ते ९ सप्टेंबर या कालावधीत क्रॅश कोर्सचे आयोजन केले असून या क्रॅश कोर्समध्ये विविध विषयांचे तज्ञ विध्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.

mba cet crash course raisoni college

या परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या लॉजिकल रिझनींग, व्हर्बल ऍबिलिटी, काँटॅटेटीव्ह ऍप्टिट्यूड अशा विविध मुद्यांवर या कोर्स मध्ये भर देण्यात येणार आहे  व स्टेट सीईटी सेलच्या परीक्षेत उत्तमत्तोम स्कोर कसा मिळवावा यासाठीही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पुढील महाविद्यालयीन प्रवेशासाठी व स्कॉलरशिप मिळवण्यासाठी सीईटीचा स्कोर हा विध्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. सदर सीईटी दिल्याशिवाय पदव्युत्तर प्रवेश व स्कॉलरशिप मिळत नाही त्या अनुषंगाने जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या क्रॅश कोर्सच्या सुवर्णसंधीचा लाभ स्टेट सीईटी सेलच्या परीक्षेला बसणाऱ्या  प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यावा असे आवाहन रायसोनी इस्टिट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले आहे.

---Advertisement---

या क्रॅश कोर्सच्या अधिक माहितीसाठी प्रा.रफिक शेख व प्रा.तन्मय भाले यांच्या ९८२३३३७८६२ व ९६५७७२४०८३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---