जातीय सलोख्यासाठी सही मोहीमेला नगराध्यक्षा साधना महाजन यांचा पाठिंबा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । पाचोरा भागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जामनेर पोलिस स्टेशनमार्फत नगर परिषदेसमोरील राजमाता जिजाऊ चौकात व पोलीस स्टेशन समोर सामाजिक ऐक्य जोपासण्यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली.या मोहीमेचे उद्घाटन जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना गिरीश महाजन यांनी प्रथम स्वाक्षरी करून उद्घाटन केले.

मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या वेळी पोलीस निरिक्षक किरण शिंदे सहायक पोलिस निरीक्षक राठोड,जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, न पा गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, पंचायत समितीचे माजी सभापती छगन झाल्टे ,नगरसेवक अतिश झाल्टे,मुश्ताक शेठ भंगारवाले, दीपक तायडे, सुभाष पवार, रवींद्र झाल्टे, निलेश चव्हाण, कैलास पालवे यांच्यासह पोलीस कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते  उत्स्फूर्तपणे सह्यांच्या मोहिमेत सामील होवून आम्ही विविध पंथ, धर्माचे लोक एकत्र व गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे दाखवून दिले.

शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केलेल्या उपक्रमाबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे