⁠ 
रविवार, मे 5, 2024

रावेर येथे ८ मे ला सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । रावेर येथील फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व बौद्ध समाजातर्फे ८ मे रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.

वीस हजार रुपये अनुदान मिळणार

शहरातील सरदार जी.जी.हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या आवारात बौद्ध समाजाचा १० वा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील. या विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणीसाठी सामूहिक विवाह सोहळा समिती अध्यक्ष राजेंद्र अटकाळे रावेर, केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे, विजय अवसरमल, अनोमदर्शी तायडे, सावदा, ॲड. राजकुमार लोखंडे (सावदा), संजय भालेराव (चिनावल), सदाशिव निकम (केऱ्हाळे खुर्द), युवराज तायडे (गाते), धनराज घेटे , राहुल गाढे, युवराज तायडे (निंबोल), सिद्धार्थ तायडे (तांदलवाडी), अर्जुन वाघ (वाघोदा) यांच्याशी संपर्क साधावा. नोंदणी केलेल्या उपवर वधू-वरांना कन्यादान योजनेतून वीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे.