जळगाव जिल्हाभुसावळ

भुसावळ शहरात १५ जोडप्यांचा सामूहिक विवाह, ३० वऱ्हाडींच्या उपस्थितीची अट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ । भाेरगाव ( ता. भुसावळ ) लेवा पंचायतीने ९ डिसेंबरला सामूहिक विवाह साेहळ्याचे आयाेजन केले आहे. त्यासाठी १५ जाेडप्यांनी नाेंदणी केली आहे. विशेष म्हणजे, लग्न समारंभांमध्ये हाेणारा अफाट खर्च आणि अन्नाची नासाडी हे वाचवण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी पंचायतीची बैठक झाली. त्यात पूर्वतयारीचा आढावा घेत कोरोना नियमांचे पालन करण्यावर एकमत झाले.

समाजातील वाढत्या अनिष्ठ प्रथांना फाटा देत भाेरगाव लेवा पंचायतीतर्फे गेल्या दाेन वर्षापासून सामूहिक विवाह साेहळ्यांचे आयाेजन केले जाते. समाजातील गरीब परिस्थिती असलेल्यांसाठी सुरू केलेला हा सामूहिक विवाह साेहळ्यात आर्थिक सुबत्ता असलेले देखील नोंदणी करताना दिसत आहेत. त्यातून लग्नकार्यात खर्च हाेणारा अफाट पैसा, नाचगाणे, जेवणावळीत हाेणारी नासाडी आपसूक टाळली जाते. डाॅ.बाळू पाटील यांच्या पुढाकारातून २०१३ मध्ये या उपक्रमास सुरूवात झाली.

पहिल्या सामूहिक विवाह सोहळ्यात २०१३ मध्ये ३ जाेडपी हाेती. नंतर १६ मार्च २०२१ रोजीच्या दुसऱ्या सोहळ्यात ५ जोडप्यांचे शुभमंगल झाले. आता ९ डिसेंबरला भुसावळ शहरातील संताेषी माता हाॅलमध्ये तिसरा सोहळा होईल. त्यासाठी १५ जाेडप्यांनी नाेंदणी केली आहे. त्यापैकी एक जोडपे इतर समाजातील आहे. या सर्व जोडप्यांना पंचायतीतर्फे कपडे, आंदण, गॅस शेगडी, दाेन सिलिंडर, मिक्सर अशा भेटवस्तू दिल्या जातील.

एका विवाहासाठी ३० वऱ्हाडी

सामूहिक विवाह साेहळ्यात वधूकडील १५ व वराकडील १५ अशा एकूण ३० वऱ्हाडींना सहभागाची परवानगी आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळूनच फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत विवाह साेहळा पार पडणार आहे. यावेळी जेवण, वाजंत्री, ब्युटिशीयन, भटजी याचा सर्व खर्च भाेरगाव लेवा पंचायतीकडून केला जाणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button