गुन्हेजळगाव शहर

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२१ । सासरच्या छळाला कंटाळून एका २७ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 27 ऑगस्ट रोजी  जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर येथे घडली. दामिणी वैभव वैदकर (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्थानकात पतीसह सासरच्या मंडळींनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंगावर पांढरे डाग असल्यासह माहेरुन पैसे आणण्याच्या कारणावरुन वारंवार होत असलेल्या पतीसह सासरच्यांच्या छळाला कंटाळून दामिणी वैदकर या विवाहितेने राहत्या गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी मध्यरात्री रामानंदनगर पोलिसात पतीसह सासरच्या चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होवून आज शनिवारी सकाळी चारही जणांना अटक करण्यात आली आहे.

दामिणी हिचा पतीसह तिच्या सासरच्यांनी वेळावेळी छळ केला. या छळामुळे तिनेच आत्महत्या केली असून सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका दामिणीच्या माहेरच्या नातेवाईकांनी घेतली होती. शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास दामिणीचा हिचा मृतदेह शवविच्छेदनानंतर तिच्या माहेरच्यांनी ताब्यात घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक राजेश शिंदे हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button