दोन सख्या अल्पवयीन बहिणींना पळविले

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील एका गावात नातेवाईकांकडे आलेल्या 15 व 17 वर्षीय अल्पवयीन बहिणींना दोघांनी फुस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार सोमवार, 7 रोजी नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आला आहे. या प्रकरणी शनिवारी दुपारी चाळीसगाव ग्रामीण पोल्लिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अल्पवयीन मुलींच्या आईने चाळीसगाव ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या 15 व 17 वर्षीय अल्पवयीन मुली त्यांच्या पुतण्याकडे एका गावात सुट्यांमध्ये आल्या असता सोमवार, 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास संशयीत संतोष कैलास सोनवणे आणि समीर शेख (पूर्ण नांव माहित नाही, दोन्ही सेलू, जि.परभणी) यांनी संगणमत करुन दोन्ही मुलींना पळवून नेले. या संदर्भात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात. तपास हवालदार नितीन श्रीराम सोनवणे करीत आहेत.