१० लाखासाठी विवाहितेचा छळ ; पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

ऑक्टोबर 26, 2021 4:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२१ । नशिराबाद येथे माहेर असलेल्या फरदोस जबीन अब्दुल अजित (वय-२१) या विवाहितेचा कार घेण्यासाठी १० लाख रूपये आणावे, असा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह चौघांवर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, नशिराबाद येथील  माहेर असलेल्या विवाहिता फरदोस जबीन अब्दुल अजित (वय-२१) रा. कंचनपूर,ता. उतरौला. जि. बलरामपूर (उत्तर प्रदेश) यांचा विवाहित अब्दुल अजित मोहम्मद मुबारक यांच्याशी रितीरीवाजानुसार झाला. लग्नानंतर तीन महिन्यांनी पती अब्दुल अजिज याने पत्नी हिला कार घेण्यासाठी माहेरहून १० लाख रूपये आणावे यासाठी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली.

सासू, दीर आणि नणंद यांनी देखील पैश्यांसाठी गांजपाठ केला. दरम्यान, हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता नशिराबाद येथे माहेरी निघून आल्यात. विवाहितेच्या फिर्यादीवरून पती  अब्दुल अजित मोहम्मद मुबारक, सासू कैसरजहा मोहम्मद मुबारक, दिर अब्दुल वाहिद मोहम्मद मुबारक आणि नणंद मैमुनाबी मोहम्मद सद्दाम सर्व रा. कंचनपूर ता. उतरौला जि. बलरामपूर (उत्तरप्रदेश) यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शिवदास चौधरी करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now