⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 6, 2024
Home | जळगाव जिल्हा | पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विकास कामांमुळे शेकडो मुस्लीम कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विकास कामांमुळे शेकडो मुस्लीम कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२४ । जळगाव ग्रामीणमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून अनेक जण शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेत आहे. अशातच आता जळगाव तालुक्यातील मण्यारखेडा येथील शेकडो मुस्लीम कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संवाद साधून आपण जाती-पातीपेक्षा केलेल्या विकास कामांमुळे पाठिंबा देऊन शिंदेसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले.

तर धरणगाव तालुक्यातील साळवा येथील असंख्य युवकांनी शिवसेनेचे ध्येय धोरण स्वीकारून पाळधी येथे असंख्य युवकांनी हाती भगवा घेत शिंदेसेनेत प्रवेश केला. पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये साळवा येथील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश झाला.

यामध्ये सामाजिक कार्यकर्ते शाम अहिरे, विशाल नारखेडे, निखिल फिरके, दीपक डोळे, पराग नेहते, केतन भोळे, किशन धनंजय इंगळे, विशाल नारखेडे, दीपक कोल्हे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी माजी सभापती मुकुंद नन्नवरे, कुणाल इंगळे, अमोल पाटील, अनिल माळी, नवल पारधी, प्रशांत झंवर, आबा माळी आदी उपस्थित होते.

मुस्लीम बांधवांनी साधला संवाद
मण्यारखेडा येथे मुस्लीम बांधवांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केली. यामध्ये शेख इस्माईल, सलीम खान, सत्तार मामू, दानिश शेख, शेख मुजम्मिल, फिरोज खान, आरिफ खान, जावेद शेख, जफर भाई ट्रांसपोर्ट वाले, सदाकत भाई, शोएब खान, उर्जेर देशमुख, नविद शाह, इकबाल पटेल, मोहसीन खान, समीर शेख, मोहसीन अजंता, समीर शेख, सलीम शाह, रहीम खान, अलीम, शोएब सैय्यद, आसिफ खान, आसिफ शेख यांचा समावेश होता. यावेळी मण्यारखेड्याचे राजू पाटील, सरपंच पिंटू पाटील, शिंदेसेनेचे महानगर प्रमुख संतोष पाटील, नारायण कोळी, दानिश पठाण उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.