मन्याड धरण १०० टक्के भरले, काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

ऑगस्ट 26, 2021 9:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२१ । मन्याड मध्यम प्रकल्प पूर्ण भरला असून आज २६ ऑगस्ट रोजी पहाटे ४.३० वा. मन्याड मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा १०० टक्के झाला असून प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या सांडव्यावरून पुराचा विसर्ग सुरू झालेला आहे.

manyad dam 100 full

तरी मन्याड नदीच्या व गिरणा नदीच्या काठावरील गावातील लोकांनी नदीत जावू नये तसेच आपली गुरे-ढोरे नदीच्या पाण्यात उतरवू नयेत. जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांनी सतर्कता बाळगून आपली काळजी घ्यावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगांव व उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, चाळीसगांव यांनी केलेले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now