मध्ये रेल्वेचा मोठा निर्णय! दिवाळी आणि छट पूजेसाठी भुसावळमार्गे अनेक विशेष गाड्या धावणार
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२४ । भारतात दिवाळी सण सगळ्यात मोठा सण असतो. नोकरीनिमित्त बाहेर गावी राहत असलेले अनेक जण दिवाळीसाठी गावी जात असतात. यादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. यादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने दिवाळी आणि छट पूजेच्या सणासाठी ९६ फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांसाठी ६ सप्टेंबर २०२४ पासून बुकिंग सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजेच या रेल्वे गाड्या भुसावळमार्गे धावणार असल्याने भुसावळकर प्रवाशांची सोय झाली आहे.
मध्य रेल्वे ‘या’ विशेष गाड्या चालवणार
1) लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – दानापूर दैनंदिन विशेष (४२ सेवा)
01143 दैनंदिन विशेष दि. २२.१०.२०२४ ते दि. ११.११.२०२४ पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दररोज १०.३० वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी १८.४५ वाजता पोहोचेल. (२१ सेवा)
01144 दैनंदिन विशेष दि. २३.१०.२०२४ ते दि. १२.११.२०२४ पर्यंत दानापूर येथून दररोज २१.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ०४.५० वाजता पोहोचेल. (२१ सेवा)
थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
संरचना: २ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ८ द्वितीय श्रेणी (१८ डब्बे).
2) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – आसनसोल साप्ताहिक विशेष (८ सेवा)
01145 साप्ताहिक विशेष गाडी दि. २१.१०.२०२४ ते दि. ११.११.२०२४ या कालावधीत दर सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ११.०५ वाजता सुटेल आणि आसनसोल येथे तिसऱ्या दिवशी ०२.३० वाजता पोहोचेल. (४ सेवा)
01146 साप्ताहिक विशेष गाडी दि. २३.१०.२०२४ ते दि. १३.११.२०२४ या कालावधीत दर बुधवारी आसनसोल येथून २१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ०८.१५ वाजता येथे पोहोचेल. (४ सेवा)
थांबे: दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय, सासाराम, देवरिया सदर, गया, कोडरमा, एनएससी बोस जे गोमो, धनबाद आणि कुल्टी.
संरचना: २ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ८ द्वितीय श्रेणी (१८ डब्बे)
3) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर दैनंदिन विशेष (४२ सेवा)
01079 साप्ताहिक विशेष दि. २२.१०.२०२४ ते दि. ११.११.२०२४ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दररोज २२.३० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी ०८.२० वाजता पोहोचेल. (२१ सेवा)
01080 साप्ताहिक विशेष दि. २४.१०.२०२४ ते दि. १३.११.२०२४ पर्यंत दररोज गोरखपूर येथून १४.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ००.४० वाजता पोहोचेल. (२१ सेवा)
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती आणि खलीलाबाद.
संरचना: २ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ८ द्वितीय श्रेणी (१८ डब्बे)
4) लोकमान्य टिळक टर्मिनस- संत्रागाची साप्ताहिक विशेष (४ सेवा)
01107 साप्ताहिक विशेष मंगळवार दि. २९.१०.२०२४ आणि दि. ०५.११.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून २०.१५ वाजता सुटेल आणि संत्रागाची येथे तिसऱ्या दिवशी ०५.०० वाजता पोहोचेल. (२ सेवा) 01108 साप्ताहिक विशेष गुरुवार दि. ३१.१०.२०२४ आणि दि. ०७.११.२०२४ रोजी संत्रागाची येथून १५.५० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल. (२ सेवा)
थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चकराधरपूर, टाटानगर आणि खरगपूर.
संरचना: १ प्रथम वातानुकूलित, ३ द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित, १ पॅन्ट्री कार आणि २ जनरेटर व्हॅन (२२ डब्बे)
आरक्षण: उत्सव विशेष ट्रेन क्रमांक 01143, 01145, 01079 आणि 01107 च्या सेवांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ०६.०९.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.