गुरूवार, जून 8, 2023

भुसावळमध्ये जोरदार पावसाची हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

जळगाव लाईव्ह न्यूज : 15 एप्रिल 2023 : एकीकडे राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाका वाढत असून त्यातच अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहेत. आज शनिवारी सायंकाळी 6.45 च्या सुमारास भुसावळ शहरासह परिसरात अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची ताराबाळ उडाली. मात्र, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

हवामान खात्याकडून राज्यातील अनके ठिकाणी गारपीठ आणि मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. जळगाव जिल्ह्यातील काही भागात दुपारपासूनचं ढगाळ वातावरण होते. सायंकाळी 6.45 नंतर भुसावळ शहरासह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

अचानक आलेल्या या जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचलेल दिसून आलं. या पावसामुळे मात्र नागरिकांना उका ड्यापासून दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आधीच गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होते. या नुकसाणीतून शेतकरी सावरत नाही त्यातच आताच्या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.