---Advertisement---
पारोळा

पाराेळाच्या मनीष ठाकूरला गोल्फ खेळात मिळाले गोल्ड मेडल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । जयपूर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघात असलेला. पारोळा येथील राणी लक्ष्मी महाविद्यालयाचा खेळाडू मनीष ठाकूर यास अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून गोल्ड मेडल मिळाले आहे. मिनी गोल्फ या खेळातील डबल मिक्स या प्रकारामध्ये त्याला गोल्ड मेडल मिळाले आहे. क्रीडा संचालक डॉ. संजय भावसार, सर्व प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसह सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

manish thakur 1 1 jpg webp

तो एरंडोल येथील रहिवासी असून कुंदन ठाकूर यांचा चिरंजीव आहे. या खेळाडूस क्रीडा संचालक डॉ. संजय भावसार यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ऍड. वसंतराव मोरे, संचालक पराग मोरे, प्रशासकीय अधिकारी रोहन मोरे, प्रभारी प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील, उपप्राचार्य तथा क्रीडा संचालक डॉ. संजय भावसार अादींनी त्याचे भरभरुन काैतुक केले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---