⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | पोलिसांची मोठी कारवाई; दीड लाखांचा गांजा जप्त, एक तस्करी गजाआड

पोलिसांची मोठी कारवाई; दीड लाखांचा गांजा जप्त, एक तस्करी गजाआड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२२ । बेकायदेशीररित्या गांजा विक्री करणाऱ्या तरूणाला पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातील तीन किलो वजनाच्या गांजासह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. असून गेल्या महिन्याभरात हि तीसरी कारवाई असल्याने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या गोठ्यात खळबळ उडाली आहे.

चाळीसगाव-भडगाव रोडवरील बोरखेडा खु. गावातील बस स्थानकाजवळ दुचाकीवरून बेकायदेशीररित्या गांजाची वाहतूक करताना एका तरूणाला ग्रामीण पोलीसांनी रात्री २ वाजता अटक केली आहे. तेजस महादेव खरटमल (वय १९) रा. जुना पावर हाऊस ता. चाळीसगाव असे अटक केलेल्या तरूणाचा नाव आहे. त्याच्या जवळून ४३,५०० रूपये किं.चे २.९०० ग्रॅम वजनाचा गांजा व १,१०,००० रूपये कि.चे हिरो होंडा कंपनीची दुचाकी (क्र. एम.एच. १९ डीएस २१७६) असे एकूण १,५३,५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केले आहे. दरम्यान गुप्त माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी सदर ठिकाण गाठून हि कारवाई केली. गेल्या महिन्याभरात हि तीसरी कारवाई असल्याने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या गोठ्यात खळबळ उडाली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश चव्हाण, सपोनि धर्मसिंग सुंदरडे, पोउपनि लोकेश पवार, पोहेकॉ दत्तात्रय महाजन, पोना जयंत सपकाळे, पोना गोवर्धन बोरसे, पोना भुपेश वंजारी, पोकॉ हिराजी शिवाजी देशमुख, पोकॉ/मनोहर पाटील आदींनी केली. पोना जयंत सपकाळे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एनडीपीएस ॲक्ट कलम- ८ (सी), २० (बी), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि रमेश चव्हाण व पोना भुपेश वंजारी हे करीत आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह