सिनेट पदवीधर निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२३ । क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तर्फे घेण्यात येणाऱ्या सिनेट पदवीधर गटाच्या निवडणूकीसाठी विद्यापीठ विकास महाआघाडी तर्फे उमेदवारी अर्ज भरण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, युवासेना जिल्हा चिटणीस, अंकित कासार, कंचन पाटील, पंकज पाटील, योगेश भावसार, भिमसिंग वळवी,नागसेन पेंढारकर,प्रवीण नेरपगार,नरेंद्र बोरसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले
यावेळी शिवसेना जिल्ह्या संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे,विरोधी पक्ष नेते सुनील महाजन,राष्ट्रवादी काँग्रेसचे कुणाल मराठे,काँग्रेसचे देवेंद्र मराठे,युवासेना जिल्हा युवा अधिकारी पियुष गांधी,निलेश चौधरी,विशाल वाणी,अमोल मोरे,महेश ठाकूर,अमोल मोरे,अमित जगताप,अजिंक्य कोळी,विलास जोशी,राजेंद्र वारके,शरद जाधव,मयूर पाटील,शुभम निकम,चेतन पाटील,विशाल काळे,सचिन पाटील,शिवसेना राष्ट्रवादी,काँग्रेस चे अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.