⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

डॉ.उल्हास पाटील कृषि महाविद्यालयातर्फे नगरपरिषद फैजपूर येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२३ । फैजपूर गावात ग्रामीण जागरूकता कार्यानुभवासाठी आलेल्या डॉ.उल्हास पाटली कृषी महाविद्यालयातील कृषिकन्यांनी २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि पूर्व प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी केली. यानिमित्ताने कृषिकन्यांनी नगरपरिषद फैजपूर व ग्रामीण परिसरात स्वछता अभियान राबवून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी भारती बोके मॅडम (टी.टी.समन्वयक) व दिनेश तेजकर (लेखी सहायक) यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच गावकऱ्यांचे सहाय्य लाभले. डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगांव येथील कृषीकन्या वैशाली रोडे, सुजाता खरात, वैष्णवी गुंजकर, सुप्रिया बडे यांनी स्वच्छता अभियानात उस्फुरतेने सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम ग्रामीण जागरूकता कार्यनुभव कार्यक्रम २०२३ २०२४ या साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम – समन्वयक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा. व संबंधित विषयातील विषय विशेष तज्ञांच्या मार्गदर्शना खाली पार पडला.