---Advertisement---
रावेर

महर्षी वाल्मिकी जयंती : रावेरला आदिवासी कोळी महासंघातर्फे प्रबोधन रॅली

---Advertisement---

Raver News-जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती सोमवारी रोजी सर्वत्र साजरी करण्यात आली त्यानुषंगाने रावेरला आदिवासी कोळी महासंघातर्फे महर्षि वाल्मीकी प्रबोधन रॅली काढण्यात आली. श्री क्षेत्र गजानन महाराज मंदिर गाते येथून रॅलीची सुरुवात करण्यात आली. सुदगाव ते तहसिल कार्यालय रावेर पर्यंत प्रत्येक गावात महर्षी वाल्मिकी यांचे प्रतिमा पूजन करून तहसिलदार यांना आदिवासी कोळी महासंघातर्फे विविध न्याय मांगण्याचे निवेदन देण्यात आले. यात अनुसूचित जमाती प्रमाणपत्र सुलभरित्या मिळणे, खावटी अनुदान वितरण व्यवस्था योग्यरित्या राबवावी, शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळावा, 36 च्या नोंदी शासनाने पुढाकार घेऊन करुन घ्याव्यात, जि. प. शाळांमध्ये आदिवासी मुलांना सुवर्ण जयंती महोत्सव शिष्यवृत्ती मिळावी, ठक्कर बाप्पा योजना योग्य प्रमाणात राबवावी, शालेय नोंदी दुरुस्त करण्यासाठी संबंधित अधिकारी यांना सूचना देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

jalgaon 2022 10 11T143203.079

तालुक्यात भव्य रॅली ही पहिल्यांदाच काढण्यात आल्याने सर्व तरुणांमध्ये जनजागृतीपर उत्साह दिसत होता. या बाईक रॅलीचे नेतृत्व आदिवासी कोळी महासंघाचे जेष्ठ जिल्हा मार्गदर्शक गंभीर दादा उन्हाळे, जिल्हा अध्यक्ष सुभाष सपकाळे,जिल्हा सरचिटणीस विश्वनाथ कोळी,जिल्हा सदस्य हरिलाल कोळी,ता.अध्यक्ष मनोहर कोळी,युवा ता. अध्यक्ष चंद्रकांत कोळी,कोळी समाज ता.अध्यक्ष ईश्वर कोळी यांनी केले.तर रॅलीचे आयोजक व नियोजन उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन कोळी, उपाध्यक्ष सुपडु मोरे सरपंच, उपाध्यक्ष संतोष पाटील, सचिव राजेंद्र महाले, सल्लागार नितीन सपकाळे सरपंच, सदस्य ईश्वर कोळी, सदस्य योगेश्वर कोळी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद कोळी, ता. प्रसिद्धी प्रमुख भागवत कोळी,शहर अध्यक्ष राजुभाऊ कोळी,सदस्य विनोद कोळी, योगेश्वर कोळी, जयराम कोळी,संदश सपकाळे,बंटी कोळी यांनी केले.

---Advertisement---

याप्रसंगी संदिप कोळी सरपंच, आनंदा कोळी सरपंच,नारायण तायडे कोळी, विनोद कोळी भगवान कोळी, विनोद दिलीप कोळी अनिल अट्रावलकर ,जितेंद्र कोळी, सागर खवले, सुभाष जैतकर, किशोर कोळी पंकज कोळी ,नंदू कोळी, ज्ञानेश्वर कोळी ,गणेश कोळी, भुषण कोळी,किशोर तायडे ,तेजस कोळी रितेश ठाकरे ,मनोहर सपकाळे विलास कोळी,दिलीप जैतकर,परविन कोळी,सचिन सोनवणे, निखिल कोळी,योगेश सैंदाणे,सचिन सपकाळे,भगवान कोळी,जगदीश सपकाळे,वासुदेव जैतकर, धीरज जैतकर ,रमेश कोळी सचिन सपकाळे सुभाष कोळी,मोहन कोळी,ईश्वर कोळी, रविकांत तायडे,हर्षल तायडे,विकास कोळी,रितेश ठाकरे,देवानंद कोळी,दिवाकर उन्हाळे, आकाश कोळी, संतोष बाविस्कर आदी असंख्य पंचक्रोशीतील समाज बांधव उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---