---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र हवामान

पुढील 72 तास महत्वाचे ; राज्यातील ‘या’ भागात गारपीटीसह मुसळधारचा इशारा, जळगावला ‘यलो’ अलर्ट जारी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२३ । राज्यात सततच्या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली असून त्यातच अवकाळी पावसाचे संकट देखील घोंगावू लागले आहे. आजपासून पुढील तीन दिवस राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कापणीला आलेल्या पिकांचा फटका बसण्याची शक्यता आहे.

rain jpg webp

एकीकडे तापमानात होणारी वाढ आणि दुसरीकडे शेतकऱ्यांसमोर हे आसमानी संकट यामुळे बळीराजी हवालदिल होताना दिसून येते आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात अवकाळीचा फटका बसण्याचा इशारा दिला आहे.

---Advertisement---

16 मार्चपर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 13 ते 16 मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. विदर्भात 14 ते 16 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पुन्हा गारपिटीसह पावसाचा अंदाज आहे.

आज या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी?
आज जळगावसह नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.

14 मार्चला या जिल्ह्यांना अलर्ट जारी?
उद्या म्हणजेच १४ मार्चला नाशिकसह अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, बीड, परभणी, पुणे या जिल्ह्यांना यलो जारी करण्यात आला आहे.

15 मार्चला या जिल्ह्यांना अलर्ट जारी?
जळगावसह, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, सोलापूर,

16 मार्चला या जिल्ह्यांना अलर्ट जारी?
जळगावसह नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, सोलापूर.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---