जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२२ । मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध भागांत अवकाळी पाऊस (unseasonal rain) पडत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. जळगावसह उत्तर महाराष्ट्र्रातील जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने पहाटपासून हजेरी लावली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना गारवा अनुभवायला मिळत आहे. मात्र, त्याच दरम्यान अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार असून, काही ठिकाणी हलका ते मध्यम व काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वीच जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.
दरम्यान, राज्यासह जिल्ह्यात दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने तापमानाचा पारा घसरला आहे. यामुळे जळगावकरांना गारवा अनुभवायला मिळत आहे. मात्र, त्याच दरम्यान अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा
9 मार्च
कोकण – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह, सोसाट्याचा वारा आणि गारा पडण्याची शक्यता.
मराठवाडा – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह, सोसाट्याचा वारा आणि गारा पडण्याची शक्यता आहे.
विदर्भ – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
10 मार्च
कोकण – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
मध्य महाराष्ट्र – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
मराठवाडा – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
विदर्भ – हवामान कोरडे राहण्याची शक्यता.