⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | गुन्हे | महाराष्ट्र हादरला : पोटच्या पोरीवर बापाने केले तब्बल 11 वर्ष अत्याचार

महाराष्ट्र हादरला : पोटच्या पोरीवर बापाने केले तब्बल 11 वर्ष अत्याचार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | ३० मे २०२२ | पिता व मुलीच्या नात्याला कलंक लावल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नराधम पित्याने पोटच्या गोळ्यावर तब्बल 11 वर्ष अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात उघड झाला आहे. पीडीता घरातून पळून गेल्यानंतर अल्पवयीन असल्याने मुकुंदवाडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला व पीडीता मिळाल्यानंतर सत्य परीस्थिती समोर आली आहे. 40 वर्षीय नराधम पित्याला अटक करण्यात आली आहे.या गुन्ह्या मुळे संपूर्ण महाराष्ट्र्र हादरला आहे.


औरंगाबाद शहरा नजीकच्या एका गावात राहणाऱ्या कुटुंबामध्ये हा प्रकार घडला आहे. एका मनोविकृत पित्याने आपल्याच मुलीवर तब्बल अकरा वर्ष अत्याचार केले असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हात संतापाची लाट उसळली आहे. मुलीच्या अजान वयात बापाने तिच्यावर अत्याचार करायचे सुरू केले. मुलगी सज्ञान झाल्यानंतर देखील हा प्रकार सुरु राहिला. याला कंटाळून मुलीने घर सोडले. मुकुंदवाडी पोलिस स्टेशनला तिच्या आईने अपहरणाचा गुन्हा नोंद केला. मात्र पीडीतेचा शोध लागल्यानंतर मात्र खरा प्रकार उघडकीस आला.


या नराधम पित्यावर सन 2013 मधे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासाअंती त्याने जेलवारी देखील केली आहे. जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने सदर अत्याचाराचा प्रकार सुरुच ठेवला. पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी नराधम बापाविरुद्ध बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमाखाली वेगळा गुन्हा दाखल केला आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह