⁠ 
रविवार, मे 19, 2024

खिरोदा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा मोफत हेल्मेट वाटप व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२१ । सावदा ता.रावेर (प्रतिनिधी) – जनता शिक्षण मंडळ सभागृह खिरोदा ता.रावेर येथे दिनांक ७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचा पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. जवळपास २२५ पत्रकारांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून मोफत हेल्मेट वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री या होत्या. त्यांनी आपल्या भाषणात पत्रकार हा देशाची ताकत असून लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे. लोकशाही मध्ये महत्वपूर्ण कार्य पत्रकारांचे असते. कोरोना काळातही पत्रकारांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

आपल्या सभोवताली घडणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टींची मांडणी ही पत्रकार योग्य पद्धतीने मांडत असतात. आणि मांडायला ही पाहिजे. असे त्या म्हणाल्या. पुरस्कारांमध्ये पत्रकारांना दोन जीवनगौरव पुरस्कार देण्यात आले त्यात दिलीप वैद्य सर रावेर, सुरेश जगन्नाथ पाटील यांना जीवन गौरव तर मूकनायक पुरस्कार देवलाल पाटील व दत्तात्रय पाटील यांना देण्यात आले. इतरही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले. पत्रकारांना पुरस्कार वितरण व पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप यशोमती ठाकूर व आमदार शिरीषदादा चौधरी व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास आ.शिरीष चौधरी, चंद्रकांत पाटील आमदार मुक्ताईनगर, विनायकराव देशमुख, अभय छाडेज, डॉक्टर उल्हास पाटील जळगाव, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, युवा नेते धनंजय चौधरी, जि प सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, जि प सदस्य सुरेखा पाटील, प्रवीण सपकाळे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पत्रकार संघ, किशोर रायसाकडा खानदेश विभागीय अध्यक्ष, प्रदीप गायके ग्रामीण जिल्हाध्यक्ष पत्रकार संघ, डिगंबर महाले उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पत्रकार संघ हे होते. यावेळी प्रास्ताविक उत्तर महाराष्ट्र पत्रकार संघ अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी केले.
सुत्रसंचालन प्रा.दिलीप सोनवणे यांनी तर आभार रावेर तालुक्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अध्यक्ष विलास ताठे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास ताठे, उपाध्यक्ष संतोष नवले, कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, सल्लागार सद्दाम पिंजारी, महेंद्र पाटील व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.