---Advertisement---
हवामान

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘यलो ॲलर्ट’

rain
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२१ । राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे. पण आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्यावतीनं 19 ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज जारी केला आहे.

rain

त्यात राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागाच्यावतीनं 19 ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज जारी केला आहे. हवामान विभागानं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट दिला आहे. तर, 19 ऑगस्टला कोणताही ॲलर्ट देण्यात आलेला नाही.

---Advertisement---

हवामान विभागानं आजच्या दिवसासाठी कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, मुंबई, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

16 ऑगस्टची पावसाची स्थिती कशी?

सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

17 ऑगस्टला राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट

हवामान विभागानं 17 ऑगस्टला राज्याच्या विविध भागात पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

18 ऑगस्टला कोकण ते विदर्भात पाऊस

सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, रायगड, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवलीत रात्रीपासून पाऊस सुरू झाला आहे. पहाटेपासून रिमझिम पाऊस  सुरू होता. मात्र, आता पावसाने जोर धरला आहे.

 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---