⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | हवामान | राज्यातील ‘या’ भागांना मुसळधार पावसाचा इशारा

राज्यातील ‘या’ भागांना मुसळधार पावसाचा इशारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २८ ऑगस्ट २०२१ | बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. परिणामी राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक हवामान तयार व्हायला सुरुवात झाली आहे.

पुढील चार दिवस दिवसांत राज्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं वर्तविली आहे.

राज्यात ३० ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार असून परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह पालघर जिल्ह्यात ऑरेंज ऍलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या सरी बसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, गुरुवारी जळगाव जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यात मागील गेल्या आठवड्यापासून पावसाचे विश्रांती घेतली. त्यामुळे उकाडा वाढू लागला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.