‘मी नाही तर 50 आमदार नाराज ; बच्चू कडूंचा गौप्यस्फोटाने खळबळ

ऑक्टोबर 27, 2022 9:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 50 आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळली होती. त्यानंतर राज्यात शिंदे गट आणि फडणवीस सरकार सत्तेत आले. मात्र शिंदे गटाकडून 50 खोके घेतल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे 50 खोके घेतल्याच्या आरोपावरून शिंदे – फडणवीस सरकारला समर्थन देणाऱ्या अमरावती जिल्ह्यतील आ. बच्चू कडू व आ. रवी राणा यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे.

bachhu kadu jpg webp

रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर खोक्यांचा आरोप केला होता. या आरोपांवर बच्चू कडूंनी पलटवार केला आहे. 50 आमदारांना खोके दिले का? हे आता शिंदे-फडणवीस यांनीच स्पष्ट करावे, असं प्रत्युत्तर बच्चू कडू यांनी दिलं आहे. इतकेच नाही तर रवी राणा यांच्यामुळे केवळ मीच नाही तर सगळे 50 आमदार नाराज झाले आहेत.

महाराष्ट्राच्या विकासाची खुंटकेली गती वाढवण्यासाठी आणि जनादेशाचा आदर करुन राज्यातील 50 आमदारांनी स्वतः हून एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी तर मंत्री असूनही त्याचा त्याग केला आणि शिंदेना समर्थन दिले. त्यावेळेपासून ठाकरे गटाकडून या 50 आमदारांवर खोके घेतल्याचे आरोप होत आहेत,’ असं बच्चू कडू म्हणाले.

‘विरोधक म्हणून आणि सत्तेवरुन पायउतार व्हावं लागल्यामुळे त्यांचे आरोप आम्ही समजू शकतो, त्याला जनताही फारशी गांभीर्याने घेत नाही. मात्र आता कधी आघाडीच्या तर कधी भाजपच्या आडोशाला राहून स्टंटबाजी करणा-या आमदार रवी राणा यांच्याकडूनच खोक्यांचे आरोप माझ्यावर झाले आहेत’, अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी केली.

‘सत्तेवर लाथ मारणारा माझ्या सारख्या स्वाभिमानी माणूस असले आरोप सहन करणार नाही. त्यामुळे मी राणा यांच्यावर पोलिसात गुन्ही दाखल केला आहे. आरोप सिद्ध करावेत नाहीतर माफी मागवी, त्यांना जशाच तसे उत्तर देऊ, असा जोरदार पलटवार बच्चू कडून यांनी केला आहे.

रवी राणा यांच्यामुळे केवळ मीच नाही तर सगळे 50 आमदार नाराज झाले आहेत. अनेकांनी मला फोन करुन याबाबत त्यांची भूमिका मांडली. राणा यांचे आरोप हे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही शिंतोडे उडवणारे आहेत, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now