जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । राज्यात उद्भवलेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. दरम्यान, या सुनावणीचे थेट प्रक्षेपण होत असून जनतेला आता घरबसल्या ही सुनावणी थेट पाहता येणार आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये रखडलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावरील याचिकांवर आज सुप्रीम कोर्टातील घटनापीठापुढे सुनावणी होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनात्मक खंडपीठाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठामध्ये होत आहे.