जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२२ । पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यात लवकरच पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment) होणार आहे. पोलीस खात्यात आता नव्याने 7 हजार 200 पदांसाठी भरती होणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Maharashtra Home Minister Dilip Walse Patil) यांनी माहिती दिली आहे.
राज्य मंत्रिडळात या संदर्भात निर्णय झाला असून लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. अहमदनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं, पोलीस भरतीच्या संदर्भात राज्यात 5200 पोलिसांच्या भरतीचं काम जवळपास पूर्णत्वाच्या दिशेने आहे. लेखी परीक्षा झाल्या, शारीरिक चाचण्या झाल्या आहेत. आता या संदर्भातील अंतिम यादी जाहीर करण्याचं काम आहे.
दुसऱ्या टप्प्यात आणखी 7200 पोलिसांच्या भरतीच्या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे आणि या संदर्भातील भरती प्रक्रियेची सुरुवात आता येत्या काही दिवसात सुरू करायची आहे असंही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं.
हे देखील वाचा :
- सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन उमेदवारांसाठी जम्बो भरती; अर्ज कसा करावा?
- भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये 10वी, 12वी पाससाठी मोठी भरती; विनापरीक्षा होणार निवड
- ITBP मध्ये 526 जागांसाठी मेगाभरती; 10वी, 12वी उत्तीर्णांना नोकरीची मोठी संधी..
- कोचिन शिपयार्डमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती; 4थी ते 10वी पास अर्ज करू शकतात..
- युनियन बँकेत ग्रॅज्युएट्स पाससाठी तब्बल 1500 जागांवर भरती; पगार 85,920